आशिष महाबळ - लेख सूची

कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा

नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर …

न्यायासाठी संवाद आवश्यक

काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक …

न्यायाची सावली आणि त्यामुळे होणारे अनाठायी रद्दीकरण

भारतीय दर्शने सहा. त्यातील न्याय अर्थात logic याच्या अंतर्गत येते कारणमीमांसा. या न्यायाचा न्यायालयातील न्याय-अन्यायाशी रूढ अर्थाने संबंध वाटत नसला तरी तो आहे. जे ग्राह्य ते न्याय्य. ते मानवतेच्या अनुषंगाने असो वा कायद्याच्या. वेगवेगळ्या समूहांची मानवतेची व्याख्या कधीकधी वेगळी असू शकते. त्यामुळे कधीकधी कायदेदेखील अमानवी ठरू शकतात.  इतक्यातलंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेत गर्भपातावर …

विविधतेमध्ये अनेकता

दगडापेक्षा विदा मऊ भारतातील मुलांच्या मनावर लहानपणापासून पाठ्यपुस्तकांद्वारे ठसवले जाते की भारतात विविधता आहे आणि विविधता असूनही एकता आहे. विविधतेत खाद्यपदार्थ, पेहराव, भौगोलिक स्थिती वगैरे गोष्टी येतात आणि एकतेत मुख्यतः भारतीय असणे आणि त्याचा अभिमान असणे हे. बहुतांश भारतीय हिंदू असूनही विविधतेमध्ये धार्मिक पैलू पण अध्याहृत असत आणि एकता मात्र देशाभिमानाद्वारे केवळ भारतीयता हीच. पाठ्यपुस्तकांमधील …

खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात? अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे …

शेतीचे आणि पर्यायाने आपले भवितव्य

सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सरकारने बनवलेल्या कायद्यांविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांमध्ये ३-४ मुद्दे आहेत. त्यातील काही मुद्द्यांवर कदाचित विवाद/ चर्चा होऊ शकतात, पण एक मुद्दा असा आहे जो कोणत्याही सुज्ञ माणसाला खटकेल: शेतकऱ्यांनी म्हटले आहे की त्यांना किमान आधारभूत किंमत अर्थात किमान हमीभाव मिळावा. सरकार म्हणत आहे, “तो तसा मिळेलच. आम्ही तसं …

स्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत

एका गोष्टीत अकबर एकदा बिरबलाला विचारतो की आपल्याला सर्वांत प्रिय काय असते. उत्तरादाखल बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासोबत एका रिकाम्या हौदात उतरवतो व हौदातील पाण्याची पातळी वाढवणे सुरू करतो. सुरुवातीला पिल्लाला वाचवायचे म्हणून माकडीण त्याला आपल्या डोक्यावर घेते. पण पुढे जेव्हा तिच्या जीवावर बेतते, तेव्हा ती सरळ पिल्लाला खाली टाकून त्याच्यावर चढून स्वत:चा जीव वाचवू …

पुन्हा-पुन्हा घडणारे अघटित

२५ मे २०२०. घटना तशी नेहमीची होती. मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाची हत्या झाली. जॉर्ज फ्लॉईड असहाय्यपणे ‘मी श्वास घेऊ शकत नाही’ असे सांगत असताना इतर ३ अकृष्ण पोलीस नुसते पाहत असतात पण डेरेक चौहीनला जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून खून करताना थांबवत नाहीत. हा प्रकार केवळ दहा पंधरा सेकंद चालला नाही तर जवळजवळ …

विषाणूंच्या अगम्य गमती – आशिष महाबळ

२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे …

घरोघरी अतिरेकी जन्मती

मला भारत सोडून जवळजवळ वीस वर्षे झाली. तुम्ही भारतातून जाऊ शकता, पण भारत तुमच्यातून जाऊ शकत नाही. दूर असल्यामुळे नेहमी सगळे जवळून पाहता येत नाही, पण बर्ड्स आय व्ह्यू मिळू शकतो. इतक्यात भारतातील आप्तांशी बोलतांना अनेकदा विकासाच्या भाषेपेक्षा त्वेषाचीच भाषा प्रकर्षाने जाणवली आहे. मार्च २०१९मध्ये कामानिमित्त इस्राइलची यात्रा झाली. जेरुसलेम हे ज्यू लोकांसाठी सर्वात पवित्र …